अप्रतिम लेख आहे नक्की वाचा:-

हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल " नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोन अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले की , त्याने ते आपल्या देशात नेऊन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोन आयात करण्यावर बंदी होती. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्यांच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मध्ये देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये सुरु केली आणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्शुरन्स, औषध क्षेत्रातही कार्यरत आहे. २००७ मध्ये सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
मित्रांनो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहीत. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमध्ये असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ?
कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामध्ये मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाही. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.
तरीही आपण म्हणायचं,
'जय हिंद ! जय महाराष्ट् !'

Post A Comment: